शिरजगाव कसबा दिनांक २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
स्थानिक रोशन बाळकृष्णराव बदुकले ,वय ३२ वर्ष, या युवक शेतकऱ्यांने घरच्या तिसऱ्या मजल्यावर टिनाचे बल्लीला गळफास लावून सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान आत्महत्या केली आहे.पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा यांनी घटनास्थळा चा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी अचलपूर जिल्हा उप रूग्णालयात पाठविण्यात आला होता .
१ वर्ष अगोदरच या मुलाचे लग्न झालेले होते. वडीलाचे नावे बाळकृष्णराव बदुकले, शिरजगाव शिवारात २ एकर शेत असून बँक ऑफ महाराष्ट्राचे १ लाखाचे शेती पिक कर्ज यांचे वडीलावर आहे. दरवर्षी होणारे पिकाचे नुकसान, लागवड खर्चही निघत नसल्यामुळे आत्महत्या केली असावी अशी गावात चर्चा आहे.यांचे मृत्युपश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा आप्त परिवार आहे.
Post a Comment
0 Comments