शिरजगाव ते ब्राह्मणवाडा थडी या रस्त्यावरील पुलाखाली एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 10, 2025

शिरजगाव ते ब्राह्मणवाडा थडी या रस्त्यावरील पुलाखाली एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला.



                                  शिरजगाव ते ब्राह्मणवाडा थडी रस्त्यावरील धक्कादायक  घटना 

अमरावती : दि.11 जुलै (ग्रामीण उदय प्रतिनिधी) शिरजगाव कसबा ते ब्राह्मणवाडा थडी रस्त्यावरील वरील लहान पुलाखाली एका ब्लॅकेटच्या आत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. १० जुलै रोजी दुपारी २:३० च्या सुमारास ती धक्कादायक घटना उघडीस  आली. 

त्या महिलेचे दोन्ही हात व दोन्ही पाय कपड्याने बांधलेल्या अवस्थेत सापडले , गळा कपड्याने आवळल्याने तिचा खून झाला असल्याचा  अंदाज पोलिसांनी वर्तविला. या प्रकरणी, शिरजगाव कसबा ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला ही २५ ते ३० वर्षे वयोगटातील आहे. 

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अचलपूर उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक शुभम कुमार व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेचा मृतदेह  तपासणी करिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृताच्या अंगावर पिवळे ब्लाऊज व पिवळी साडी आहे. महिलेच्या हातात काचेच्या बांगड्या व पायात पैंजण आहेत. . ही माहिती मिळताच शिरजगाव कसबा पोलिस व एलसीबीने घटनास्थळ गाठले. मृतदेहाची पाहणी करून त्या महिलेचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असावा, असा अंदाज वर्तविला. मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजूनही मृताची ओळख पटली नाही . 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages