जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते *प्रतिसाद न देण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 23, 2025

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक खाते *प्रतिसाद न देण्याचे आवाहन


अमरावती, दि. २४  : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे. यावरून विविध प्रकारच्या विनंत्या पाठविण्यात येत आहे. यास कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या नावे बनावट खाते करून फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे. तसेच सैन्य दलातील मित्राचे फर्निचर विकायचे असल्याची पोस्ट करण्यात आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार असल्याने त्यास प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकारची कोणतीही पोस्ट किंवा खाते तयार करण्यात आले नसून नागरिकांनी बनावट खात्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये किंवा संपर्क साधू नये. यात नागरिकांची फसवूणक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे फसवणूकीचे संदेश आल्यास स्विकारू नये किंवा ब्लॉक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages