Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जांसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ

           अमरावती, दि. ४  (कार्यालय प्रतिनिधि ) :  माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे सन २०२४-२५ वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत १५ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी तसेच सन २०२३-२४ करिता Re-Apply करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

          या संदर्भात, ऑनलाइन नूतनीकरण आणि विहित मुदतीत अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर त्वरित कार्यवाही करावी. तसेच, विद्यार्थ्यांनी केलेली त्रुटीपूर्तता करून "SEND BACK" केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी त्वरित त्रुटीपूर्तता करून जिल्हा लाईनवर पाठवावेत.

          जिल्ह्यातील महाविद्यालय , महाविद्यालयांना नूतनीकरणाचे अर्ज भरण्याचे तसेच Re-Apply करण्याचे आणि SEND BACK केलेले अर्ज त्रुटीपूर्तता करून भरण्याचे आवाहन सहायक आयुक्त  राजेंद्र जाधव यांनी केले आहे.




--

Post a Comment

0 Comments