अमरावती, दि. ४ (कार्यालय प्रतिनिधि ): जवाहर नवोदय विद्यालय,अमरावती मध्ये शैक्षाणिक सत्र २०२६-२७ करिता इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर www.navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/
प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा. तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शाळेतून सत्र २०२५-२६ मध्ये वर्ग पाचवीत अध्ययनरत असावा. अर्ज करताना विद्यार्थ्यांने स्वतःच्या आधारकार्ड क्रमांकाने अर्ज करावा. ज्या विद्यार्थ्यांची शाळा नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात येत असेल त्यांनी शहरी विभागातून अर्ज करावेत. विद्यार्थ्यांचा जन्म १ मे २०१४ ते ३१ जुलै २०१६ दरम्यान असावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे .
Post a Comment
0 Comments