अमरावती, दि. ०६ (कार्यालय प्रतिनिधी) : भारतीय डाक विभागामार्फत डाक अदालतीचे आयोजन ९ जून २०२५ रोजी प्रवर अधीक्षक, डाक घर अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
विभागातील पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर याबाबत तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग, अमरावती ४४४६०२ यांच्याकडे सादर करावा. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीसह उल्लेख करुन दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पाठवावे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.
Post a Comment
0 Comments