Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती दि. १४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास सोमवार दि. ३०  जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, प्रवर्गांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करतेवेळी चुकून राईट टू गीव्ह अप ऑप्शन हे बटन दाबले गेले असल्याने त्या विद्यार्थ्यांना रिव्हर्ट ऑप्शन उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३०  जून २०२५  पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानाने राईट टू गीव्ह अप पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांने त्याच्या महाविद्यालयाशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीन मधून रिव्हर्ट राईट टू गीव्ह अप ॲप्लीकेशन पर्यायाचा वापर करून विद्यार्थ्यांने आपला अर्ज दि. ३० जून २०२५  पूर्वी रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. तसेच रिव्हर्ट बँक झालेला अर्ज विहीत वेळेत म्हणजेच दि. ३०  जून २०२५  पुर्वी विद्यार्थ्यांने त्याच्या लॉगिनमधून ऑनलाईनरित्या फेरसादर करणे आवश्यक आहे.

महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थी, तसेच महाविद्यालयांना सादर झालेल्या रिव्हर्ट राईट टू गीव्ह अप ॲप्लीकेशन पुनश्च सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


 

--

Post a Comment

0 Comments