Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुदत 20 जूनपर्यंत

अमरावती, दि. ०६  (कार्यालय प्रतिनिधी): इतर मागास बहुजन कल्याण विभाग विशेष मागास प्रवर्गातील ‘गोवारी’ समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता १ ली ते १२  वी  पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी इंग्रजी माध्यम निवासी शाळा चालविणाऱ्या व इच्छुक असलेल्या नामांकित संस्था, शाळांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने शाळा निवडीचे निकष, पात्रता, अटी व शर्ती या विभागाच्या १४ मे २०२५  रोजीच्या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहितीसह www.maharashtra.gov.in  या संकेतस्तळावर उपलब्ध आहेत. इच्छुक शैक्षणिक संस्था, शाळांनी दि. २०  जनू २०२५  रोजी सायंकाळी ५  वाजेपर्यंत माहितीसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती या कार्यालयात शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरुन परिपुर्ण अर्ज सादर करावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक गजेंद्र मालठणे यांनी केले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments