अमरावती, दि.२४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यानुसार, श्री. पाटील यांचे दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर अमरावती विश्रामगृह येथे राखीव आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजता शैलेश पोतदार आणि सकाळी 8.45 वाजता शिवराय कुळकर्णी यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर यवतमाळकडे प्रयाण करतील.
