आणि
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ चा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच सन २०२६-२७ च्या नियोजनाबाबतची कार्यशाळा शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) उत्साहात पार पडली. येथील कठोरा रोडवरील पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानांतर्गत अमरावती विभागातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. विविध निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विभागस्तरीय पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती :
पहिली श्रेणी : बुलडाणा जिल्हा व तालुक्यातील सावळी ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पार्डी ग्रामपंचायतीने द्वितीय आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एरंडगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला.
दुसरी श्रेणी : या श्रेणीमध्ये अमरावती जिल्ह्यातीलच तीन ग्रामपंचायतींनी बाजी मारली. यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायतीने प्रथम, चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा ग्रामपंचायतीने द्वितीय, तर अचलपूर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला.
पुढील वर्षाचे नियोजन आणि जलसमृद्धीवर मार्गदर्शन
पुरस्कार वितरणानंतर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२६-२७’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष नियोजन कार्यशाळा घेण्यात आली. या सत्रात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गाव जलसमृद्ध करण्यासाठी तज्ज्ञांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
अमरावती जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विभागातील मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खातेप्रमुख, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी समन्वय साधत हा सोहळा यशस्वी केला.