काश्मीरमधील श्रीनगर येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक लाल चौकातील घंटाघर परिसर हजारो पारंपरिक पणत्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला आहे. या भागात अत्यंत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लाल चौक परिसरात तब्बल ११,००० हून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता.
या दीपोत्सवामध्ये स्थानिक काश्मीरी नागरिक, देश-विदेशातून आलेले पर्यटक आणि तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवान यांनी एकत्र येत आनंद साजरा केला. या सोहळ्यातून काश्मीर खोऱ्यात शांतता आणि सलोख्याचा मोठा संदेश देण्यात आला.
बदलते काश्मीर: एका काळी संध्याकाळनंतर जिथे शुकशुकाट असायचा, तिथे आता रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा खुल्या असतात आणि नागरिक कोणतीही भीती न बाळगता सण-उत्सव साजरे करत आहेत.
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे आणि तेथील सुरक्षित वातावरणाचे श्रेय या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आले आहे.

