निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘जीवन प्रमाण’ॲपद्वारे हयातीचे दाखले सादर करण्यासाठी विशेष अभियान





अमरावती, दि.१४(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
: राज्य शासनासह इतर सर्व निवृत्तीवेतनधारकांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान व्हावी, या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या वतीने अमरावतीसह, धारणी, अचलपूर  आणि वरुड येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांनी या विशेष अभियानाचा लाभ घेऊन आपले जीवन प्रमाणपत्र विहित मुदतीत अद्ययावत करावे, असे आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.

 

निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल पद्धतीने घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करता यावे, यासाठी ‘जीवन प्रमाण’ पोर्टल तसेच फेस ऑथेंटिकेशन सुविधेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्यक्ष नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

या अभियानांतर्गत उपकोषागार कार्यालय, वरुड येथे १७ नोव्हेंबर, धारणी येथे १९ नोव्हेंबर आणि अचलपूर येथे २० नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती येथील जिजाऊ सभागृहात १६ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आधार कार्ड (मोबाईल क्रमांकाशी संलग्न), पीपीओ क्रमांक किंवा निवृत्तीवेतन पुस्तिका, बँक पासबुकची छायांकित प्रत आणि ओटीपी पडताळणीसाठी स्मार्ट मोबाईल फोन सोबत आणणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday