राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

 

दि. ३० अमरावती 



देशाचे राष्ट्रसंत आद्यपत्रकार , स्वातंत्र सैनिक  तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण देशवासीयांसाठी अजरामर कार्य केले आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथाने ग्रामविकासाला चालना मिळाली आहे. यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली आहे. 

यासंदर्भात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ केंद्रीय पदाधिकार्यांची सभा अमरावती जिल्हा परिषद विश्रामगृहावर राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. 

 सभेला राष्ट्रीय  कार्याध्यक्ष युसूफखान पठाण,  राष्ट्रीय  उपाध्यक्ष प्रदीप जोशी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख , राष्ट्रीय  सरचिटणीस राजेंद्र भुरे,केंद्रीय चिटणीस अशोक पवार,बाबाराव खडसे , बाळासाहेब सोरगीवकर, अरुण कुलथे , संजय तल्हार ,सुरेशसिंग मोरे ,संदीप सुने , सुधाकर टिपरे,  अनंत बोबडे , महेश बुंदे , दिनेश भटकर , मदन भाटे, सचिन ढोके, प्रकाश रंगारी ,उपस्थित होते.
 याकरिता सर्व पत्रकारांनी शहर व गाव स्तरावर देशाचे राष्ट्रसंत आद्यपत्रकार , स्वातंत्र सैनिक  तुकडोजी महाराज  यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी स्वाक्षरी मोहीम राबवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांना पाठवावे असे ठरविण्यात आले आहे. 
      

أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday