मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा सवाल: दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार द्या...
दि.१६ :-
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारने दिवाळीपूर्वी फक्त ५ हजार रुपयांची मदत जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "महागाईच्या काळात ५ हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी होणार?" असा उद्विग्न सवाल नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित करत आहेत. दिवाळी सणाचा आनंद घेण्याऐवजी शेतकऱ्यांसमोर बँक कर्ज, मशागतीचा खर्च आणि मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची भरीव मदत देऊन दिवाळी गोड करावी, अशी आग्रही मागणी या बातमीतून करण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
शेतीसाठी झालेला मोठा खर्च, बिियाणे, खते आणि मजुरीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. त्यातच दिवाळी सण तोंडावर असल्याने कुटुंबाचा खर्च आणि सणाचा आनंद कसा साजरा करावा, या चिंतेत शेतकरी वर्ग अडकला आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, केवळ कागदी घोषणा न करता प्रत्यक्ष जमिनीवर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात यावी.