*महात्मा फुले विचार साहित्य संमेलन २८ व २९ नोव्हेंबरला*


 अमरावती दि. १९  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सव वर्षा निमित्त महात्मा फुले विचार साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावती येथे २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.


        या साहित्य संमेलनाचे आयोजन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद व श्री गुरुदेव सेवा  श्रम ट्रस्ट राधानगर अमरावती यांच्यावतीने करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमाला अमरावती शहरातील मराठा सेवासंघ व त्याचे सर्व कक्ष, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, महात्मा फुले द्वी शताब्दी जन्मोत्सव समिती, दि विदर्भ माळी शिक्षण संस्था, उपेक्षित समाज महासंघ संघ, गाडगेबाबा अध्यासन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कर्मयोगी गाडगेबाबा विचार मंच, महाराष्ट्र  अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जनसाहित्य परिषद, आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था,  हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, सुजन मराठी साहित्य परिषद, मराठा फ्रेंड्स क्लब, विवेकानंद वाचनालय, शेतकरी संघ महाराष्ट्र , यावली शहीद भूमिपुत्र समाज सेवा समिती, आदिसंपदा, बांधिलकी प्रतिष्ठान,नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य अमरावती. 

अशा अनेक समविचारी संस्था सहकार्य करीत आहेत. या संमेलनात उद्घाटन समारंभ, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार,  पुस्तकांचे प्रकाशन,  तीन परिसंवाद, दोन कवीसंमेलने, कथाकथन समारोप समारंभ इत्यादी कार्यक्रमांचा  समावेश आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून अनुदान मिळणार आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ सतीश तराळ, डॉ.दिलीप काळे, डॉ.काशिनाथ बऱ्हाटे, वसंतराव वंडलकर,श्रीधरराव डहाके, रामदासजी सदर, बाळासाहेब
महल्ले, अनंतराव हगोने प्रफुल्ल मंदा श्रीधर इत्यादी मंडळी परिश्रम घेत आहेत.

أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday