नवोदयचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 



 

अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे शैक्षणिक सत्र 2027 – 28 मधील इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्र दि. 29 ऑक्टोबरपासून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

जवाहर नवोदयसाठी प्रवेश परीक्षा दि. 28 नोव्हेंबर 2026 रोजी 61 केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षार्थींचे प्रवेशपत्र cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळावरून नि:शुल्क डाऊनलोड करावे लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday