भारतीय जनता पार्टी शिरजगाव कसबा च्यावतीने कृष्णदिप प्रशांत ठाकरे याचा सत्कार


दि. २१ शिरजगाव कसबा:


 शिरजगाव कसबा येथील  कृष्णदीप प्रशांत ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात संघ लोकसेवा आयोगाची (एसएसबी) परीक्षा यशस्वीरेत्या उत्तीर्ण करून भारतीय सेनेत लेफ्टनंट पद मिळवले आहे.
कृष्णदीपने केवळ 22 वर्षाच्या वयात हे यश मिळवले आहे. एसएसबी परीक्षा उत्तीर्ण केली. या दैदिप्यमान यशाबद्दल भारतीय जनता पार्टी, शिरजगाव कसबा यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कृष्णदीप यांच्या या यशामुळे शिरजगाव कसबा गावाच्या प्रतिष्ठेत मोठी भर पडली असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि देशसेवेची आवड असणाऱ्या तरुणांना त्यांच्या या प्रवासातून नक्कीच मोठी प्रेरणा मिळणार आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल आज कृष्णदिप प्रशांत ठाकरे यांचे भारतीय जनता पार्टी शिरजगाव कसबाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी मनोहर सुने(माजी जि प सभापती), संजय थेलकर(विधानसभा संयोजक),साहेबराव अस्वार (भाजपा शक्ति केंद्रप्रमुख), संजय कोसे(माजी सैनिक), किरण जावरकर(भाजपा शाखाप्रमुख),  सामाजिक कार्यकर्ते देवानंद निमकर, मनोज राजस, पंकज ढोले आणि प्रशांत ठाकरे, महेंद्र ठाकरे,अक्षय तराळ  उपस्थित होते. 
उपस्थित सर्व मान्यवरांनी कृष्णदीप यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे विशेष कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस तसेच भावी सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



 
أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday