दुर्मिळ फोटो बारी समाजाचे दैवत श्री संत रुपलाल महाराज

 

अकोट येथे संत रुपलाल महाराज यांच्या भेटीच्या  दुर्मिळ ऐतिहासिक सोहळयाच्या आठवणींना उजाळा
अकोट दि. १७ 
मधुकर केदार 
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
अकोला जिल्ह्यातील अकोट येथे अंदाजे वर्ष १९९२ मधील एका अत्यंत दुर्मिळ आणि कौटुंबिक भेटीचा क्षण नुकताच समोर आला आहे. श्री संत रुपलाल महाराज यांची माकोडे व बेले परिवाराने घेतलेली ही एक आशीर्वाद दर्शन भेट होती. या भेटीदरम्यानच्या दुर्मिळ छायाचित्रामुळे ३ दशक जुन्या भक्तीमय आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.
या विशेष भेटीदरम्यान, श्रीमती शांताबाई हरीभाऊ माकोडे यांनी संत रुपलाल महाराज यांचे पारंपरिक पद्धतीने कपाळावर टिळक लावून भावपूर्ण पूजन व औक्षण केले. या प्रसंगी महाराजांचे दर्शन घेऊन परिवाराने त्यांचे आशीर्वाद घेतले.
या दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार म्हणून माकोडे, बेले आणि बेराड परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. यात शालीग्राम माकोडे, वासुदेवराव माकोडे, गजानन माकोडे , सुशिला हरीभाऊ माकोडे, बेबीताई प्रल्हादराव माकोडे आणि रितेश श्रीकृष्ण माकोडे या माकोडे परिवारातील सदस्यांसह निर्मला  सुनीलराव बेले, लक्ष्मि पुंडलिकराव बेराड, प्रमिला मिसाळ आणि कौशल्या भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
अकोट परिसरातील एकत्र कुटुंब पद्धती आणि संतांविषयी असलेली अपार श्रद्धा दर्शवणारा हा एक मौल्यवान ऐतिहासिक दस्तऐवज ठरला आहे.
हा सोहळा म्हणजे अकोट परिसरातील भक्तीपरंपरा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे एक सुंदर प्रतीक मानला जात आहे. या जुन्या आणि मौल्यवान आठवणींमुळे अकोट परिसरातील संत परंपरेच्या जुन्या स्मृतींना आजच्या पिढीसमोर पुन्हा जिवंत केले आहे.
أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday