आटोसह आटो चोरट्यास वलगाव परिसरातुन केले अटक ,चांदुर बाजार पोलिसांची कारवाई
ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क
विलास खाजोने/चांदुर बाजार - येथिल आठवडी बाजारातील आटोस्टापवरुन २३ आक्टोबरला मध्यरात्री चांदुर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसाबपूरा रहीवासी दानिश खान जमीर खान याचा मॅक्सझिमा कंपनीचा अंदाजे ७० हजार रुपये किंमतीचा आटो क्र.एम.एच.४९ ए.आर.५७१३ हा आटो चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास कार्यास सुरुवात केली असता त्यांना वलगाव परिसरात हा आटो फिरत असल्याची गुप्त सुचना मिळाली.त्या आधारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वलगाव परिसरातुन आटोसह आटो चोरणारा संशयित आरोपी आशिष उर्फ अक्षय ऊर्फ बिसलेरी माणिक उईके वय २१ वर्षे रा.लहास ता.भैसदही जिल्हा बैतूल मध्यप्रदेश यास अटक केली असून अपराध क्र.५००/२०२६ भाऊ.द.वी.३०३(२)B.N.S.अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड उपविभागीय अधिकारी माधव गरुड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार आधारसिंग सोनोने यांचे नेतृत्वात रविंद्र बावने, आशिष राऊत, जितेश सावरकर, वैभव आकोटकर यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.
