दिनांक: ३ सप्टेंबर २०२६
अमरावती दि. ३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्रांना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्वीकारण्याचा कालावधी १ ते ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. नवीन परीक्षा केंद्राच्या अर्जाची किंमत १ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
संबंधितांनी निर्धारित कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक असून, ३० सप्टेंबर २०२६ नंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव प्रिया देशमुख यांनी कळविले आहे.