अमरावती, दि.२९ (*ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क*) : माय भारत केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1600 ठिकाणी सहभागी होणाऱ्या आठ लाखांहून अधिक युवकांना आभाशी माध्यमातून संबोधन करण्यात आले. याद्वारे देशभरातील युवक आभासी माध्यमातून एकत्र जुळले. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर येथील पोटे पाटील महाविद्यालय आणि बियाणी महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. या अंतर्गत युवक संवाद व विविध सहभागात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला .
माय भारत स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष युवा संवाद सत्र आयोजित करण्यात आला आहे. गेल्या 12 वर्षांत भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासात झालेल्या परिवर्तनावर चर्चा करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील युवक, माय भारत स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी झाले, असे माय भारत केंद्र, अमरावती आणि राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले होते..
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानात सहभागी झाले.