अमरावती, दि.८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्याद्वारे जिल्ह्यातील 'क' व 'ड' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांची 2026 ते 2029 या कालावधीसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सहकार कायदा, निवडणूक नियम आणि संबंधित कामकाजाचा पुरेसा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शासकीय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, तसेच अर्बन बँक फेडरेशन, पतसंस्था फेडरेशन, साखर कारखाना महासंघ यांसारख्या स्तरावरील फेडरल संस्थांमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, अनुभवी वकील, सनदी प्रमाणित लेखापरीक्षक (CA), स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेवानिवृत्त शिक्षक आणि खाजगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकही या पदासाठी पात्र ठरू शकतील.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिनांक 31 मे 2026 पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती, सहकार संकुल, कांता नगर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. या निवडीबाबतच्या सविस्तर अटी, शर्ती आणि अर्जाचा नमुना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या (http://scea.maharashtra.gov.
Post a Comment
0 Comments