डाक विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, April 30, 2026

डाक विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात



अमरावती, दि. ३०(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतीय डाक विभाग, अमरावती विभागांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला नागपूर परिक्षेत्राचे डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे उपस्थित होते. अमरावती डाक विभागाचे प्रवर अधीक्षक श्री. गेडाम अध्यक्षस्थानी होते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टपाल विभागाच्या विविध सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 'अतिविशिष्ट' कामगिरी केली, अशा गुणवंतांचा डॉ. सुधीर जाखरे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. जाखरे यांनी, प्रत्येक कर्मचारी हा विभागाचा कणा आहे. तांत्रिक युगात ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले. प्रवर अधीक्षक श्री. गेडाम यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages