*महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन
अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत अमरावती येथे विभागीय मिनी सरस व जिल्हा प्रदर्शनी 'वैदर्भी महोत्सव - जागर स्त्री शक्तीचा'चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या दि. 4 ते 8 मार्च या कालावधीत सायन्स स्कोर मैदानात होणार आहे.
यात प्रदर्शनात अमरावती विभाग व जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शनासाठी एकूण 150 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. दररोज अमरावती तसेच इतर जिल्ह्यांतील सुमारे एक हजार महिला महोत्सवात उपस्थित राहतील. या प्रदर्शनादरम्यान महिला सक्षमीकरणासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. या महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments