उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न





अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): उष्मालाट जनजागृती या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक  दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन एडीआरए इंडिया व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार नितीन खटके, आदित्य खंडारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, जिल्हा साथरोग आरोग्य अधिकारी श्री. अली, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे, क्षेत्रीय अधिकारी संतोष गिरी यावेळी उपस्थित होते.

उष्मालाट उपायोजना जनजागृती या प्रकल्पाबद्दल इमरान माजिद तर अध्ययनाबाबत माहिती श्रीमती ली यांनी दिली. अनिल भटकर यांनी येणारे दिवसांमध्ये उष्माघाताचे वाढते परिणाम व त्यावर उपाययोजना, कार्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच  वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज साळुंखे यांनीही उष्माघात या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघना क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रविकिरण मोरे तर आभार  श्री. सोविक यांनी मानले.


--
أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday