Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

खरीप हंगामाची ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन


*शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १४ सप्टेंबरपर्यंत मुदत

 
अमरावती, दि. ४  : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन २०२५-२६ या वर्षासाठी खरीप हंगामाची ई-

पीक पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांना स्वतःहून १४ सप्टेंबरपर्यंत ई-पीक करता येणार आहे.

 
राज्यात १ ऑगस्ट २०२५ पासून या वर्षासाठी खरीप हंगामाची ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. या पाहणीसाठी जमाबंदी आयुक्त यांच्याकडून 'ई-पीक पाहणी डीसीएस' मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवर ४.०.० व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून आपल्या सातबारा उताऱ्यावर खरीप हंगामातील पिकांची ऑनलाइन पद्धतीने नोंद करावी, ही नोंदणी १४ सप्टेंबर २०२५ पूर्वी करणे आवश्यक आहे.
 
या नोंदणीमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई, तसेच नाबार्डमार्फत आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात येणाऱ्या शेतमालाचा लाभ मिळू शकतील. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी केली नसल्यास त्यांना शासनाकडून मिळणारे लाभ आणि किमान आधारभूत किमतीवर धान्याची खरेदी योजनेचा लाभ मिळण्यासाठी समस्या निर्माण होतील. त्यामुळे १४ सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांनी स्वतःहून नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments