भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव.. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, May 13, 2026

भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव..


दि. १४ 

 

भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत दिनांक 1 मे पासून स्व गणना सुरू झालेली आहे.याबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांनी नागरिकांना स्व गणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.सदर आव्हानाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर या गावातील सर्व कुटुंबांनी स्व गणना पूर्ण केली.अशा प्रकारे 100% स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले.

या गावांचा आदर्श घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी 15 मे पर्यंत स्व गणना पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले.निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे व तहसीलदार अक्षय मांडवे यांचे मार्गदर्शनात सदर काम पूर्ण करण्यात आले. मंडळ अधिकारी संतोष धुर्वे,गौरव सुरपाटणे,ग्राम महसूल अधिकारी व्ही बी बिहाडे, व्हि. बी दहाट, धम्मपाल वानखडे,महसूल सेवक सीमा वानखडे,प्रशांत बिरे यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages